आमदार धंगेकर ससूनच्या डीनवर भडकले

पुणे, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : आमदार रवींद्र धंगेकर ससूनचे डीन डॉ. ठाकूर यांच्यावर भडकले. धंगेकरांनी विचारलेल्या प्रश्नांवर योग्य उत्तरे न दिल्याने धंगेकरांना संताप सहन झाला नाही. “पैसे घेऊन तुम्ही ललित पाटीलला सांभाळल का?” असे आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले. “तुम्ही देखील भ्रष्टाचारी आहात, पैसे तुम्ही पण खाल्ले” असा आरॊप धंगेकरांनी डॉ. ठाकूर यांच्यावर केला. “तुम्ही […]

आमदार धंगेकर ससूनच्या डीनवर भडकले

पुणे, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : आमदार रवींद्र धंगेकर ससूनचे डीन डॉ. ठाकूर यांच्यावर भडकले. धंगेकरांनी विचारलेल्या प्रश्नांवर योग्य उत्तरे न दिल्याने धंगेकरांना संताप सहन झाला नाही. “पैसे घेऊन तुम्ही ललित पाटीलला सांभाळल का?” असे आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले. “तुम्ही देखील भ्रष्टाचारी आहात, पैसे तुम्ही पण खाल्ले” असा आरॊप धंगेकरांनी डॉ. ठाकूर यांच्यावर केला. “तुम्ही पुण्यामध्ये राहण्याच्या लायकीचे नाहीत” असेदेखील धंगेकर म्हणाले. अधिवेशनातदेखील प्रश्न उपस्थित करू असा दम धंगेकरांनी डॉ. ठाकूरांना भरला आहे.

चार वर्षांपूर्वी एमडी ड्रग्स प्रकरणात पकडलेला ललित पाटील पुण्याच्या येरवडा कारागृहात होता. काही दिवसांपूर्वी तो पुणे पोलिसांना चकवा देऊन फरार झाला. याच प्रकरणात आमदार धंगेकर यांनी ससूनच्या डीनची भेट घेतली आणि संताप व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number