मुंबई, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत जनहिताचे सात निर्णय झाले.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे सात निर्णय
१. राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना. मुलींना करणार लखपती.
२. सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण. मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार.
३. सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये
४. पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळणार.
५. फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार
६. भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन
७. विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता