फडणवीसांच्या रत्नागिरी दौऱ्याआधी फलकबाजी

रत्नागिरी, ०८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. भाजपा कार्यकर्त्यांनी फडणवीसांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. मात्र शिवसेनेच्या शिंदे गटाकडून लावले गेलेले देवेंद्र फडणवीस यांचे फलक लक्षवेधी ठरले आहे. काही फलकांवर योगेश कदम, रामदास कदम यांच्या फोटोसह देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या असून फडणवीस यांना राजनीति धुरंदर असा उल्लेख काही […]

फडणवीसांच्या रत्नागिरी दौऱ्याआधी फलकबाजी

रत्नागिरी, ०८ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. भाजपा कार्यकर्त्यांनी फडणवीसांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. मात्र शिवसेनेच्या शिंदे गटाकडून लावले गेलेले देवेंद्र फडणवीस यांचे फलक लक्षवेधी ठरले आहे. काही फलकांवर योगेश कदम, रामदास कदम यांच्या फोटोसह देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या असून फडणवीस यांना राजनीति धुरंदर असा उल्लेख काही फलकावर पाहायला मिळतो आहे. एकीकडे धुरंदर तर दुसऱ्या स्वागताच्या फलकावर देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह विकास पुरुष अश्या नावाचा उल्लेख आहे. विशेष म्हणजे हे फलक फडणवीस यांना दिलेली विशेषणे ही शिवसेनेच्या शिंदे गटाकडून दिल्यामुळे सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number