एसटी बसला अपघात

बुलढाणा, ६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: एसटी बसच्या अपघाताचं सत्र सुरूच आहे. बुलढाण्यामध्ये पुन्हा एकदा एसटी बसचा भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये १३ प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. छत्रपती संभाजीनगर -मलकापूर दरम्यान एसटी बसचा अपघात झाला आहे. मर्दळी घाटात बस उलटून हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल […]

एसटी बसला अपघात

बुलढाणा, ६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: एसटी बसच्या अपघाताचं सत्र सुरूच आहे. बुलढाण्यामध्ये पुन्हा एकदा एसटी बसचा भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये १३ प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. छत्रपती संभाजीनगर -मलकापूर दरम्यान एसटी बसचा अपघात झाला आहे. मर्दळी घाटात बस उलटून हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील मर्दळी घाटात छत्रपती संभाजीनगर -मलकापूर बसचा भीषण अपघात झाला आहे. बस घाटात उलटली. या अपघातामध्ये तेरा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जाणांना बुलढाणा रुग्णालयात तर नऊ जणांना धाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यु टर्न घेत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि बस घाटात पलटी झाल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, जखमींवर उपचार सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number