नवी दिल्ली, ४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मोदी सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदान २०० रुपयांवरून ३०० रुपयांपर्यंत वाढवले आहे. याआधी रक्षाबंधन (राखी पौर्णिमा) आणि ओणमचा योग साधून मोदी सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना २०० रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. आता अनुदानात १०० रुपयांची वाढ झाली आहे.
जेव्हा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर ११०० रुपयांच्या घरात पोहोचला होता तेव्हा सवलतीचा सिलिंडर ९०० रुपयांत मिळत होता. ‘उज्ज्वला’च्या लाभार्थ्यांना सिलिंडर ७०० रुपयांत उपलब्ध होता. अनुदानातील वाढीमुळे आता ‘उज्ज्वला’च्या लाभार्थ्यांना सिलिंडर ६०० रुपयांत उपलब्ध होणार आहे.