मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन आणि व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय यांच्यात सामंजस्य करार झाला. या करारानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजुल्याचा कोथळा काढण्यासाठी वापरलेले वाघनख नावाचे शस्त्र भारतात येणार आहे. करार करताना संग्रहालयाने दिलेल्या माहितीमुळे मविआ तोंडावर पडली आहे.
शिवरायांच्या पराक्रमाची आठवण जपण्याचा प्रयत्न शिंदे सरकार करत आहे. पण शंकेखोर मविआ आणि त्यांच्या समर्थकांनी भारतात येत असलेले वाघनख खरे आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता. इंद्रजित सावंत यांनी वाघनख खरे आहे की खोटे असा प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर आमदार आदित्य आणि आमदार जितेंद्र आव्हाड या दोघांनीही भारतात येणार असलेले वाघनख खरे आहे की खोटे अशी शंका उपस्थित केली होती. मविआ समर्थक आणि शरद पवार समर्थकांनी वाघनखाविषयी शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाने माहिती दिली आणि शंकेखोर मविआ समर्थक उघडे पडले. शरद पवार समर्थकांचा दावा खोटा ठरला.
“छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून मुख्यमंत्री आणि मी ब्रिटिश प्रशासनाशी सामंजस्य करार करुन त्यातील अटींची पूर्तता करुन नोव्हेंबरपर्यंत ती महाराष्ट्रात आणू”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले होते. यानंतर ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र शासन आणि व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय यांच्यात सामंजस्य करार झाला. या करारामुळे वाघनख हे शस्त्र लवकरच महाराष्ट्रात येणार हे निश्चित झाले. तसं पाहाता शिवाजी महाराजांची तलवार, वाघनख, टीपू सुलतानाची तलवार, कोहिनूर हिरा, मयुर सिंहासन या गोष्टींची चर्चा अधूनमधून होत असते किंवा तशी घडवलीही जाते. पण ताज्या घडामोडीनंतर मविआ आणि त्यांच्या समर्थकांची वाघनख प्रकरणात पंचाईत झाल्याची चर्चा आहे.
वाघनखाची गोष्ट
छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजुल्याचा कोथळा काढला, त्यासाठी वापरलेलं वाघनख भारतात येत आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीन वर्षांसाठी हे वाघनख महाराष्ट्रात आणले आहे. मात्र, भारतात येणार असलेले वाघनख शिवपराक्रमात वापरलेले नाही असा दुष्प्रचार पवार समर्थकांनी गेले काही दिवस चालवला होता. तो दुष्प्रचार इंग्लडच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तु संग्रहालयाने हाणून पाडला आहे. वाघनख मुनगंटीवार यांना देताना ज्या वेष्टनात घालून दिले आहे त्यावर सुवर्णाक्षरात स्पष्टपणे शिवपराक्रमाचा पुरावा देण्यात आला आहे.