श्री स्वामी समर्थ गुरुपीठकडून स्वछता अभियान

मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक यांच्यातर्फे मुंबईच्या जुहू चौपाटी येथे स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले. तसेच, जे. जे. हॉस्पिटल आणि श्री स्वामी समर्थ गुरुपीठ यांच्या विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. रक्तदान शिबिरामध्ये ७० सेवेकर्‍यांनी रक्तदान केले. मोफत नाडी परीक्षण आणि आरोग्य शिबिरही चौपाटीवर भरवले होते. […]

श्री स्वामी समर्थ गुरुपीठकडून स्वछता अभियान

मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक यांच्यातर्फे मुंबईच्या जुहू चौपाटी येथे स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले. तसेच, जे. जे. हॉस्पिटल आणि श्री स्वामी समर्थ गुरुपीठ यांच्या विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. रक्तदान शिबिरामध्ये ७० सेवेकर्‍यांनी रक्तदान केले. मोफत नाडी परीक्षण आणि आरोग्य शिबिरही चौपाटीवर भरवले होते. यासाठी १२ डॉक्टरांचा चमू उपस्थित होता.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठतर्फे हा उपक्रम दरवर्षी जुहू चौपाटी येथे घेतला जातो. स्वामी समर्थ गुरुपीठातर्फे चंद्रकांत दादासाहेब मोरे यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पाहार अर्पण करून आरोग्य शिबिराची सुरुवात केली. तसेच सागरपूजन करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सुमारे २५०० सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत हे अभियान संपन्न झाले. या अभियानाला ठाणे, पालघर, पश्चिम मुंबई, मध्य मुंबई, नवी मुंबई आणि गुजरात येथून सेवेकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

मुंबईतील पाचही विभागातील १६० सेवा केंद्रांच्या माध्यमातून हे स्वच्छता अभियान आणि आरोग्य शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. आरोग्य शिबिरामध्ये जवळपास तीनशे रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number