विस्तारकांच्या बैठकीत फडणवीसांच्या सूचना

मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच भाजपाची दादर येथे मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीमध्ये भाजपाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं आहे. या बैठकीमध्ये फडणवीसांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विस्तारकांना महत्त्वाचे आदेश […]

विस्तारकांच्या बैठकीत फडणवीसांच्या सूचना

मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच भाजपाची दादर येथे मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीमध्ये भाजपाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं आहे.

या बैठकीमध्ये फडणवीसांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विस्तारकांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर ‘राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आपल्यासोबत सत्तेत सहभागी असले तरी महाराष्ट्रात भाजपाच बॉस आहे’, असं वक्तव्य देखील देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची माहिती आहे. त्यांच्या या वक्तव्यावर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सध्या राज्यात शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या एकत्रिकरणाने सरकार चालत आहे. अशातच भाजपा हाच बॉस असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तर बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तारकांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. ‘स्वतः साठी १० तास, तर पक्षासाठी १४ तास द्या. गाव, तालुका, जिल्हा पातळीवरील प्रभावित व्यक्तींना संपर्क करा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्याचबरोबर फडणवीस यांनी विस्तारकांना पुढील एका वर्षाचा रोडमॅप बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number