नवी दिल्ली, २ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : विज्ञान विश्वातील सर्वात प्रतिष्ठित समजला जाणारा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन शास्त्रज्ञांना जाहीर करण्यात आला. हंगेरीतील कॅटलिन कारिको आणि अमेरिकेतील ड्रू वाईसमन यांना कोरोना प्रतिबंधक mRNA लस विकसित करण्यासाठी नोबेल पुरस्कार विभागून जाहीर करण्यात आला.
कोरोना विषाणू स्पाईक प्रोटिनचा वापर करून स्वतःची ताकद वाढवतो. कोरोना प्रतिबंधक mRNA लस या प्रोटिनवर हल्ला करून विषाणूची कार्यक्षमता नष्ट करते. यासाठी लस शरीरातील पेशींची मदत घेते. हे संशोधन करण्यात कॅटलिन कारिको आणि ड्रू वाईसमन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कार्यासाठीच त्यांना नोबेल पुरस्कार विभागून जाहीर करण्यात आला.