रायगडमध्ये स्वच्छता मोहीमेदरम्यान सापडलं चरस

रायगड, १ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: राज्यात ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी हा उपक्रम साजरा केला जात आहे. रायगडमध्ये मात्र ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रम राबवत असताना चरसची पाकिटं आढळून आली आहेत. रायगड-अलिबाग तालुक्‍यातील वरसोली समुद्र किनाऱ्यावर ही चरसची पाकिटं आढळून आली. स्वच्छता मोहीम सुरू असतानाच चरसची १० पाकिटं सापडली. यापूर्वी […]

रायगडमध्ये स्वच्छता मोहीमेदरम्यान सापडलं चरस

रायगड, १ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: राज्यात ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी हा उपक्रम साजरा केला जात आहे. रायगडमध्ये मात्र ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रम राबवत असताना चरसची पाकिटं आढळून आली आहेत. रायगड-अलिबाग तालुक्‍यातील वरसोली समुद्र किनाऱ्यावर ही चरसची पाकिटं आढळून आली. स्वच्छता मोहीम सुरू असतानाच चरसची १० पाकिटं सापडली. यापूर्वी देखील रायगडच्या समुद्र किनाऱ्यालगत चरस सापडण्याच्या घटना घडल्या होत्या.

गेल्या महिनाभरात रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्यावर चरस असणाऱ्या पिशव्या सापडल्या आहेत. २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त रविवारी सकाळी सात वाजल्यापासून रायगड जिल्हा परिषदेनं वरसोली समुद्र किनारा स्वच्छ करण्यासाठी मोहीम राबविण्यास सुरुवात केली. मुख्य किनाऱ्यावर स्वच्छता करताना एका कर्मचाऱ्याला एक प्लॅस्टिकची मोठी पिशवी आढळली. त्यावर कचरा असल्यानं ती बाहेर काढण्यात वेळ गेला. बाहेर काढलेल्या पिशवीमध्ये अजून सुमारे आठ पिशव्या सापडल्या. या सर्व पिशव्यांमध्ये चरस असण्याची शक्यता उपस्थित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आणि तातडीनं जिल्हा पोलिसांना पाचारण करण्यात आलं. त्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. त्या पिशव्यांमध्ये चरस असल्याचं निष्पन्न झालं.अशाच प्रकारच्या पिशव्या गेल्या महिन्यात रायगड किनाऱ्यावर सापडल्या आहेत. तब्बल आठ कोटींचा माल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number