पुणे, २८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुका यंदाही रेंगाळल्या आहेत. तेवीस तास उलटले तरी पुण्यातील दोनशेपेक्षा जास्त सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचे विसर्जन व्हायचे आहे. मंडळांनी लवकरात लवकर बाप्पाला निरोप द्यावा म्हणून पुणे पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. दोन मंडळांच्या मिरवणुकांमध्ये भरपूर अंतर असल्यामुळे आणि प्रत्येक मंडळ अद्याप वाजतगाजत, सावकाश पुढे सरकत असल्यामुळे विसर्जनाचा कार्यक्रम […]
पुणे, २८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुका यंदाही रेंगाळल्या आहेत. तेवीस तास उलटले तरी पुण्यातील दोनशेपेक्षा जास्त सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचे विसर्जन व्हायचे आहे. मंडळांनी लवकरात लवकर बाप्पाला निरोप द्यावा म्हणून पुणे पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. दोन मंडळांच्या मिरवणुकांमध्ये भरपूर अंतर असल्यामुळे आणि प्रत्येक मंडळ अद्याप वाजतगाजत, सावकाश पुढे सरकत असल्यामुळे विसर्जनाचा कार्यक्रम लांबत चालला आहे.