हिंगोली आणि पंढरपुरात जोरदार पाऊस

हिंगोलीत पावसाचा कहर हिंगोली जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसत असून जिल्ह्यातील अनेक ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील खानापूर गावाजवळ असलेला ओढ्याला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे अंभेरी, ईसापुर, खानापूर, चिंचोली यासह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कामानिमित्त शहरात जाणारे नागरिक त्याचबरोबर शाळकरी विद्यार्थ्यांना या पूर परिस्थितीमुळे अडथळा […]

हिंगोली आणि पंढरपुरात जोरदार पाऊस

हिंगोलीत पावसाचा कहर

हिंगोली जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसत असून जिल्ह्यातील अनेक ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील खानापूर गावाजवळ असलेला ओढ्याला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे अंभेरी, ईसापुर, खानापूर, चिंचोली यासह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कामानिमित्त शहरात जाणारे नागरिक त्याचबरोबर शाळकरी विद्यार्थ्यांना या पूर परिस्थितीमुळे अडथळा निर्माण झाला आहे.

पंढरपुर सध्या परतीच्या पावसाचा जोर

पंढरपुर सध्या परतीच्या पावसाने जोर धरला आहे. सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.आज मंगळवारी देखील सुमारे दोन तासाहून अधिक काळ मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरातील सर्व सखल भागात पाणी साचले गेले. पंढरपूर परिसरात प्रामुख्याने परतीचा पाऊस पडतो. त्यामुळे सध्या पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिक सुखावले गेले आहेत. मात्र एकादशी असल्याने पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मात्र पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number