विरोधकांना भाजपाचं प्रत्युत्तर

नागपूर, २५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : नागपूर शहरात मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीमुळे झालेल्या हानीची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळी केली. उपमुख्यमंत्र्यांनी अंबाझरी ओव्हर फ्लो पॉईंट, अंबाझरी लेआऊट, डागा लेआऊट, कॉर्पोरेशन कॉलनी, शंकरनगर परिसरात भेट देत थेट नागरिकांशी संवाद साधला, माहिती जाणून घेतली. यावेळचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. […]

विरोधकांना भाजपाचं प्रत्युत्तर

नागपूर, २५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : नागपूर शहरात मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीमुळे झालेल्या हानीची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळी केली. उपमुख्यमंत्र्यांनी अंबाझरी ओव्हर फ्लो पॉईंट, अंबाझरी लेआऊट, डागा लेआऊट, कॉर्पोरेशन कॉलनी, शंकरनगर परिसरात भेट देत थेट नागरिकांशी संवाद साधला, माहिती जाणून घेतली. यावेळचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरून काँग्रेसने भाजपा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. या टीकेला भाजपाने प्रत्युत्तर देत खोचक टोला लगावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस हे पाहणी करत असताना, अनेक नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत होते. याचा एक व्हिडिओ समोर आला असून, या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस एक कार्यकर्त्याचा हात धरून त्याला समोर आणताना दिसत आहेत. हा व्हिडीओ महाराष्ट्र काँग्रेसने एक्सवर शेअर करत भाजपावर टीका केली. पावसाच्या पाण्याने झालेल्या हानीची माहिती सांगणाऱ्या नागरिकांसोबत अहंकारी फडणवीसांची अरेरावी. हीच काय आपल्या मतदारांनासोबत वागण्याची पद्धत? याला सत्तेचा माज नाही तर अजून काय म्हणणार? या शब्दांत हल्लाबोल केला. यावर भाजपने अधिकृत एक्स हँडलवरून अर्थात ट्विटरवरून उत्तर दिले. काँग्रेसने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यापुढे काय झाले, हे सांगणारा व्हिडीओ भाजपाने शेअर केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number