नवी दिल्ली, २२ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : माजी पंतप्रधान एच. डी देवेगौडा यांचा जनता दल धर्मनिरपेक्ष पक्ष रालोआत सामील झाला आहे. देवेगौडा यांचे पुत्र आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते. या भेटीनंतर नड्डा यांनी ट्वीट करून जनता दल धर्मनिरपेक्ष पक्ष रालोआत सामील झाल्याचे जाहीर केले. जनता दल धर्मनिरपेक्ष पक्ष रालोआत सामील झाल्यामुळे रालोआ आणखी सक्षम झाल्याचे नड्डा यांनी ट्वीट करून सांगितले.