नवी दिल्ली, २० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक लोकसभेत संमत झाले. विधेयकाच्या समर्थनात ४५४ मते पडली. विधेयकावर गुरुवारी २१ सप्टेंबर रोजी राज्यसभेत चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर विधेयकावर राज्यसभेत मतदान घेतले जाईल. राज्यसभेत विधेयक संमत झाले की राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी जाईल. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. याआधी विधेयकावरील चर्चेत स्मृती इराणी आणि सोनिया गांधी यांच्यासह साठ खासदार सहभागी झाले.
परंपरागत पद्धतीने मतदान
संसदेचे कामकाज नव्या इमारतीत सुरू झाले आहे. पण या इमारतीत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान घेण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यामुळे बुधवारी २० सप्टेंबर रोजी परंपरागत पद्धतीने मतदान घेण्यात आले. मतपत्रिकांची मोजणी केल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला.
नारी शक्ती वंदन विधेयक (महिला आरक्षण विधेयक)
विधेयकाच्या समर्थनातील मते : ४५४
विधेयकाच्या विरोधातील मते : २