गजानन महाराज पुण्यतिथी

शेगांव, २० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगांवच्या संत श्री गजानन महाराजांची आज ११३ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्याने मोठ्या संख्येने भाविक शेगांव येथे दाखल झालेले आहेत. भाविकांनी शेगांव येथे महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. गजानन महाराजांनी आठ सप्टेंबर १९१० रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी समाधी घेतली होती. त्यामुळे हा दिवस श्री […]

गजानन महाराज पुण्यतिथी

शेगांव, २० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगांवच्या संत श्री गजानन महाराजांची आज ११३ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्याने मोठ्या संख्येने भाविक शेगांव येथे दाखल झालेले आहेत. भाविकांनी शेगांव येथे महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. गजानन महाराजांनी आठ सप्टेंबर १९१० रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी समाधी घेतली होती. त्यामुळे हा दिवस श्री संत गजानन महाराजांचा पुण्यतिथी उत्सव म्हणून साजरा केला जातो. सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आणि विशेषता ग्रामीण भागातून हजारो भजनी दिंड्यासुद्धा सहभागी झाल्या आहेत. शेगावात शेकडोंच्या संख्येने दिंड्या दाखल झाल्या असून पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रींची पालखी अश्व ,रथ, मेनादिंडी आदि वैभवासह सपूर्ण गावात नगर परिक्रमा करणार आहे. यावेळी टाळ मृदुंगाच्या निनादात हरी नामाच्या गजराने शहरातील वातावरण अगदी भक्तिमय होऊन जाते. श्री संत गजानन महाराज संस्थान तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या वर्षभरातील उत्सवापैकी हा देखील एक मोठा उत्सव असतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number