नाशिक, १४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीचे काम होणार आहे. या कामामुळे नाशिक शहराला दोन दिवस पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे. शनिवार १६ सप्टेंबर रोजी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर रविवार १७ सप्टेंबर रोजी नाशिक शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नाशिक महापालिका […]
नाशिक, १४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीचे काम होणार आहे. या कामामुळे नाशिक शहराला दोन दिवस पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे. शनिवार १६ सप्टेंबर रोजी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर रविवार १७ सप्टेंबर रोजी नाशिक शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नाशिक महापालिका प्रशासनाने ही माहिती दिली.