विद्यार्थ्यांना १२ तासात बोट देण्याचा न्यायालयाचा आदेश’, ‘जय महाराष्ट्र’च्या बातमीचा दणका

छत्रपती संभाजीनगर, १३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामधील भिवधानोरा या गावातील आठ ते दहा विद्यार्थ्यांना थर्माकोलच्या साह्याने शाळेत जावे लागत होते. या संदर्भातील वृत्त जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी दाखवले. त्याची दखल मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने घेत सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय जी खोब्रागडे […]

विद्यार्थ्यांना १२ तासात बोट देण्याचा न्यायालयाचा आदेश’, ‘जय महाराष्ट्र’च्या बातमीचा दणका

छत्रपती संभाजीनगर, १३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामधील भिवधानोरा या गावातील आठ ते दहा विद्यार्थ्यांना थर्माकोलच्या साह्याने शाळेत जावे लागत होते. या संदर्भातील वृत्त जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी दाखवले. त्याची दखल मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने घेत सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय जी खोब्रागडे यांनी विद्यार्थ्यांना बोटीने प्रवास करण्यासाठी प्रशिक्षित नावाडी आणि मोटार बोट बारा तासात उपलब्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

ही बोट शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना नेण्याआणण्यासाठी वापरावी. इतर वेळेत गर्भवती महिलांसाठी आणि आरोग्याच्या संबंधित अडचण असलेल्या नागरिकांसाठी या बोटीचा वापर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मुलांना लाईफ जॅकेट देण्यात यावे. निधीची कमतरता असेल तर यावर स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून तोडगा काढावा असेही आदेश खंडपीठाने दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number