दादर धीमी लोकल बंद होणार

मुंबई, १३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांक एकचे रुंदीकरण होणार आहे. या कामामुळे फलाट क्रमांक एकला जोडून असलेल्या फलाट क्रमांक दोनला शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३ पासून बंद केले जाणार आहे. जोपर्यंत फलाट क्रमांक दोन बंद असेल तोपर्यंत दादर धीमी लोकल बंद राहणार आहे. फलाट क्रमांक दोन पुन्हा सुरू केल्यावर दादर […]

दादर धीमी लोकल बंद होणार

मुंबई, १३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांक एकचे रुंदीकरण होणार आहे. या कामामुळे फलाट क्रमांक एकला जोडून असलेल्या फलाट क्रमांक दोनला शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३ पासून बंद केले जाणार आहे. जोपर्यंत फलाट क्रमांक दोन बंद असेल तोपर्यंत दादर धीमी लोकल बंद राहणार आहे. फलाट क्रमांक दोन पुन्हा सुरू केल्यावर दादर धीमी लोकल नव्याने सुरू करणार की नाही, हे रेल्वे प्रशासनाने अद्याप जाहीर केलेले नाही. आता धीमी दादर लोकल पकडणाऱ्यांना परळ येथून धीमी लोकल पकडावी लागेल.

सध्याची फलाट क्रमांक एकची स्थिती

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांक एकची सध्याची लांबी २७० मीटर आणि रुंदी सात मीटर आहे. रुंदीकरणानंतर फलाट क्रमांक एकची रुंदी साडेदहा मीटर होणार आहे. यामुळे फलाट क्रमांक एकवरील गर्दी हाताळणे रेल्वे प्रशासनाला सोपे होणार आहे.

मध्य रेल्वेचे दादर स्थानक
फलाट क्रमांक एक : सीएसएमटी-परळहून सुटणाऱ्या धीम्या लोकल
फलाट क्रमांक दोन : दादरहून सुटणाऱ्या लोकल
फलाट क्रमांक एकचे रुंदीकरण
प्रकल्पाचा खर्च : एक कोटी रुपये
कालावधी : दोन महिने
रुंदीकरणामुळे मिळणार असलेल्या सोयी : रुंद फलाट, सरकते जिने, रुंद जिने

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number