युवा स्वाभिमान दहीहंडी, विदर्भातली सर्वात मोठी दहीहंडी

अमरावती, १० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : अपक्ष खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवी राणा यांनी युवा स्वाभिमान दहीहंडीचे आयोजन केले आहे. ही विदर्भातली सर्वात मोठी दहीहंडी आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मार्गावरील नवाथे चौक येथे युवा स्वाभिमान दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. राणा दाम्पत्य दरवर्षी युवा स्वाभिमान दहीहंडीचे आयोजन करते. सालाबादप्रमाणे यंदाही राणा दाम्पत्याने दहीहंडीचे […]

युवा स्वाभिमान दहीहंडी, विदर्भातली सर्वात मोठी दहीहंडी

अमरावती, १० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : अपक्ष खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवी राणा यांनी युवा स्वाभिमान दहीहंडीचे आयोजन केले आहे. ही विदर्भातली सर्वात मोठी दहीहंडी आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मार्गावरील नवाथे चौक येथे युवा स्वाभिमान दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

राणा दाम्पत्य दरवर्षी युवा स्वाभिमान दहीहंडीचे आयोजन करते. सालाबादप्रमाणे यंदाही राणा दाम्पत्याने दहीहंडीचे आयोजन केले आहे. दहीहंडी हा सण गुरुवार ७ सप्टेंबर २०२३ रोजी झाला. पण राणा दाम्पत्याच्यावतीने रविवार १० सप्टेंबर रोजी युवा स्वाभिमान दहीहंडीचे आयोजन केले. यंदाच्या युवा स्वाभिमान दहीहंडीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हिंदी चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी , हिंदी चित्रपट अभिनेता राजपाल यादव यांचे आगमन झाले आहे. खासदार नवनीत राणा यांनी फडणवीस यांचे स्वागत केले. युवा स्वाभिमान दहीहंडीला नागरिकांनी गर्दी केली आहे.

दहीहंडीच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे विशेष स्वागत

नवाथे चौकातील युवा स्वाभिमान दहीहंडीच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले. फडणवीस येताच जेसीबीद्वारे मोठा हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर खासदार नवनीत राणा यांनी फडणवीस यांचे स्वागत केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number