राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी पुन्हा संपावर

मुंबई, १० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचाऱ्यांनी २०२१ मध्ये ५४ दिवस संप केला होता. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यावेळी हे प्रकरण उच्च न्यायालयातही गेले होते. अखेर हा संप मिटल्यानंतर कर्मचारी पुन्हा कामावर आले. परंतु आता पुन्हा कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लालपरी पुन्हा ठप्प […]

राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी पुन्हा संपावर

मुंबई, १० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचाऱ्यांनी २०२१ मध्ये ५४ दिवस संप केला होता. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देण्याची मागणी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यावेळी हे प्रकरण उच्च न्यायालयातही गेले होते. अखेर हा संप मिटल्यानंतर कर्मचारी पुन्हा कामावर आले. परंतु आता पुन्हा कर्मचाऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लालपरी पुन्हा ठप्प होणार की काय? अशी शंका निर्माण झाली आहे.

राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी पुन्हा संपावर गेले आहे. सोमवारपासून एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेकडून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार ११ सप्टेंबरपासून मुंबई येथील आझाद मैदानावर कर्मचारी उपोषण करणार आहेत.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता मिळावा, घरभाडे मिळावे, वार्षिक वेतनवाढीची रक्कम फरकासह मिळावी, यासाठी आंदोलन केले जात आहे. तसेच कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मुख्य मागण्यांसाठी एसटी कर्मचारी उपोषण करणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number