आदित्य ७१ हजार किलोमीटर उंचीवर

बंगळुरू, १० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : इसरोने प्रक्षेपित केलेले ‘आदित्य एल – १’ पृथ्वीपासून ७१ हजार किलोमीटर उंचीवर जाऊन पोहोचले आहे. सूर्याच्या दिशेने ‘आदित्य एल – १’ चा प्रवास सुरू आहे. ‘आदित्य एल – १’ सूर्यापासून काही हजार किमी अंतरावर एल – १ या ठिकाणी स्थिरावणार आहे. या भागात पृथ्वी आणि सूर्य या दोन्हीचे गुरुत्वीय […]

आदित्य ७१ हजार किलोमीटर उंचीवर

बंगळुरू, १० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : इसरोने प्रक्षेपित केलेले ‘आदित्य एल – १’ पृथ्वीपासून ७१ हजार किलोमीटर उंचीवर जाऊन पोहोचले आहे. सूर्याच्या दिशेने ‘आदित्य एल – १’ चा प्रवास सुरू आहे. ‘आदित्य एल – १’ सूर्यापासून काही हजार किमी अंतरावर एल – १ या ठिकाणी स्थिरावणार आहे. या भागात पृथ्वी आणि सूर्य या दोन्हीचे गुरुत्वीय बल नसते. यामुळे एल – १ या ठिकाणावरून आदित्य एल – १ हा उपग्रह सूर्याचा अभ्यास करून त्याचे अहवाल पृथ्वीवर इसरोच्या नियंत्रण कक्षाला पाठवणार आहे.

‘आदित्य एल – १’ पृथ्वीला प्रदक्षिणा घालत आहे. ठराविक दिवशी इंजिन सुरू करून यानाला पुढे ढकलून पृथ्वीपासूनचे ‘आदित्य एल – १’ चे अंतर वाढवले जात आहे. आतापर्यंत तीन वेळा इंजिन सुरू करून ‘आदित्य एल – १’ ला पृथ्वीपासून दूर ढकलण्यात आले आहे. आता ‘आदित्य एल – १’ पृथ्वीपासून ७१ हजार किलोमीटर उंचीवर आहे. ‘आदित्य एल – १’ सध्या २९६ किमी x ७१७६७ किमी या नव्या कक्षेत फिरत आहे. इसरो शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी दोन वाजता आदित्यचे इंजिन सुरू करणार आहे. ही इंजिन सुरू करण्याची चौथी वेळ असेल. यावेळी आदित्य पृथ्वीपासून आणखी दूर जाईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number