अमरावती : ऑगस्ट महिन्यात अमरावती जिल्ह्यात पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती. पण गुरुवारी अमरावतीत पाऊस परतला आहे. तासभर पडलेल्या पावसाने काही प्रमाणात शेतकरी सुखावला आहे. तर पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. गुरुवारी पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अमरावती : ऑगस्ट महिन्यात अमरावती जिल्ह्यात पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती.
पण गुरुवारी अमरावतीत पाऊस परतला आहे. तासभर पडलेल्या पावसाने काही प्रमाणात शेतकरी सुखावला आहे. तर पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. गुरुवारी पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.