पावसासाठी मालेगाववासियांचे देवाला साकडे

मालेगाव, ७ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : तीन महिन्यापासून मालेगावमध्ये पुरेसा पाऊस पडलेला नाही. तसेच राज्यात अनेक ठिकाणी अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. यामुळे महाराष्ट्रापुढे दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. या संकटातून मार्ग निघावा यासाठी मालेगाव येथील भारतीय वाल्मिकी मेहतर समाजाच्या वतीने श्री गुरू गोरखनाथजी महाराज व श्री गुरू जहारविर गोगा देवजी महाराज यांच्या पवित्र छडीची […]

पावसासाठी मालेगाववासियांचे देवाला साकडे

मालेगाव, ७ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : तीन महिन्यापासून मालेगावमध्ये पुरेसा पाऊस पडलेला नाही. तसेच राज्यात अनेक ठिकाणी अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. यामुळे महाराष्ट्रापुढे दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. या संकटातून मार्ग निघावा यासाठी मालेगाव येथील भारतीय वाल्मिकी मेहतर समाजाच्या वतीने श्री गुरू गोरखनाथजी महाराज व श्री गुरू जहारविर गोगा देवजी महाराज यांच्या पवित्र छडीची मिरवणूक काढण्यात आली.

वाल्मिकी समाज बांधवांनी मोसमपूल ते पोलीस कवायत मैदान अशी मिरवणूक काढली. श्री गुरुजींच्या छडीची विधिवत पूजा आणि होमहवन करून गुरूंच्या चरणी साखळे टाकत प्रार्थना करण्यात आली. यावेळी देवा देवा पाणी दे,मालेगाववासियांना दुष्काळाच्या संकटातून मुक्ती मिळू दे. अशी आर्त विनवणी करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number