भारतीय संघाचा नेपाळवर १० गडी राखून विजय

कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने केलेल्या धमाक्याच्या जोरावर भारतीय संघाने आशिया कप २०२३ मध्ये विजयाचं खातं उघडलं आहे. भारताने नेपाळ विरुद्धच्या सामन्यात १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने यासह सुपर ४ मध्ये धडक दिली आहे. भारताचा सुपर ४ मधील पुढील सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. त्यामुळे […]

भारतीय संघाचा नेपाळवर १० गडी राखून विजय

कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने केलेल्या धमाक्याच्या जोरावर भारतीय संघाने आशिया कप २०२३ मध्ये विजयाचं खातं उघडलं आहे. भारताने नेपाळ विरुद्धच्या सामन्यात १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने यासह सुपर ४ मध्ये धडक दिली आहे. भारताचा सुपर ४ मधील पुढील सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा थरारक सामना पाहायला मिळणार आहे.

पावसामुळे भारतीय संघाला डीएसएसनुसार २३ ओव्हरमध्ये १४५ धावांचं सुधारित आव्हान मिळालं. रोहित आणि शुबमन या सलामी जोडीनेच हे आव्हान २०.१ ओव्हरमध्ये पूर्ण केलं. या जोडीने नाबाद १४७ धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा याने ५९ चेंडूंमध्ये ५ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ७४ धावा केल्या. तर शुबमन गिल याने ६२ चेंडूमध्ये ८ चौकार आणि १ षट्कारच्या मदतीने नाबाद ६७ धावा केल्या. नेपाळकडून कुणालाही भारताचा १ ही गडी बाद करता आला नाही.

नेपाळने ४८.२ ओव्हरमध्ये ऑलआऊट २३० धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी २३१ धावांचं आव्हान मिळालं. भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन ही सलामी जोडी मैदानात आली. या दोघांनी २.१ ओव्हरमध्ये बिनबाद १७ धावा केल्या. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. पावसामुळे जवळपास ६०-८० मिनिटांचा खेळ वाया गेला. त्यानंतर १० वाजता पंचांनी पाहणी केली. त्यानंतर १० वाजून ३० मिनिटांनी खेळाला सुरुवात झाली. पावसामुळे अनेक षटकांचा खेळ वाया गेला. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी डकवर्थ लुईस नियमांनुसार २३ ओव्हरमध्ये सुधारित १४५ धावांचं आव्हान मिळालं. भारतीय संघाने हे आव्हान एकही विकेट न गमावता पूर्ण केलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number