पुण्याहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस रद्द

पुणे, ३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: जालन्यातील झालेल्या लाठीमार प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. अशातच मराठवाड्याकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याहून छत्रपती संभाजीनगर, जालन्याला जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून संभाजीनगर आणि जालन्याला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. जालना येथील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर […]

पुण्याहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस रद्द

पुणे, ३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: जालन्यातील झालेल्या लाठीमार प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. अशातच मराठवाड्याकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याहून छत्रपती संभाजीनगर, जालन्याला जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून संभाजीनगर आणि जालन्याला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

जालना येथील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर राज्यभरात त्याचे संतप्त पडसाद उमटले आहेत. याचेच परिणाम म्हणजे एसटी बससेवा रद्द करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा मोठा फटका मराठवाड्याला बसला आहे. पुण्यावरून एसटीने छत्रपती संभाजीनगरला, जालन्याला निघालेले बरेच प्रवासी अडकून पडल्याचे समोर आले आहे. प्रवाशांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, धुळे, श्रीरामपूर, बीड या भागातील एसटी बस पुर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर लातूरला जाणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. दररोज या भागांमध्ये ६०० एसटी बस सोडण्यात येतात. याचा मोठा फटका सामान्य प्रवाशांना बसला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number