परवाना नसेल तर पाळीव श्वान होणार जप्त

छत्रपती संभाजीनगर, १८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : घरात कुत्रा आहे, तर आता त्यासाठी परवाना घेणे बंधनकारक असणार आहे. शहरात बहुतांशी जणांकडे पाळीव कुठे आहे तर काहींकडे मांजरही आहे. मात्र, पाळीव प्राण्यांचे नियमित लसीकरण करावे लागते. परंतु प्राणी पाळण्यासाठी परवाना घ्यावा लागतो, याचीच कल्पना बहुसंख्य प्राणी प्रेमींना नाही. त्यामुळे परवान्यासाठी मनपाकडे अर्जच येत नसल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी […]

परवाना नसेल तर पाळीव श्वान होणार जप्त

छत्रपती संभाजीनगर, १८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : घरात कुत्रा आहे, तर आता त्यासाठी परवाना घेणे बंधनकारक असणार आहे. शहरात बहुतांशी जणांकडे पाळीव कुठे आहे तर काहींकडे मांजरही आहे. मात्र, पाळीव प्राण्यांचे नियमित लसीकरण करावे लागते. परंतु प्राणी पाळण्यासाठी परवाना घ्यावा लागतो, याचीच कल्पना बहुसंख्य प्राणी प्रेमींना नाही. त्यामुळे परवान्यासाठी मनपाकडे अर्जच येत नसल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

शहरातील कोणत्याही व्यक्तीला आपल्या घरी अथवा अपार्टमेंटमध्ये कोणताही प्राणी पाळायचा असेल, तर त्या प्राण्याची नोंदणी मनपाच्या आरोग्य अथवा कोंडवाडा विभागाकडे करणे बंधनकारक आहे. मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम १९४९ चे कलम १२७, (क) ४५७ (१३) अन्वये मनपा हद्दीत पाळीव श्वान अथवा मांजर घरात बाळगण्यासाठी मनपाकडून परवाना घेणे बंधनकारक आहे.

पाळीव प्राण्यांची नोंदणी व परवान्याचे नूतनीकरण करताना संबंधित प्राण्याच्या लसीकरणाचा पुरावा सादर करावा लागतो. तसेच पाळीव श्वान महानगरपालिकेच्या परवानगी शिवाय अनाधिकृत पाळले असे गृहीत धरून विषेश मोहिमे अंतर्गत पाळीव श्वान नियम (११) अन्वये जप्त करण्यात येईल, असे देखील सांगण्यात आले आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number