राज्यात तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार

नाशिक, १८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रात आज वेगवेगळ्या केंद्रावर तलाठी या पदासाठी ऑनलाईन परीक्षा झाली. राज्यभरातील लाखो तरुण सध्या तलाठी भरतीच्या ४ हजार ६०० पेक्षा जास्त जागांच्या निघालेल्या भरतीसाठी आपलं नशिब आजमवत आहेत. यासाठी ते प्रचंड मेहनत घेत आहेत. ते प्रचंड जिद्द आणि चिकाटीने परीक्षेचा अभ्यास करत आहेत. असं असताना नाशिकमध्ये तलाठी परीक्षेत गैरप्रकार […]

राज्यात तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार

नाशिक, १८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्रात आज वेगवेगळ्या केंद्रावर तलाठी या पदासाठी ऑनलाईन परीक्षा झाली. राज्यभरातील लाखो तरुण सध्या तलाठी भरतीच्या ४ हजार ६०० पेक्षा जास्त जागांच्या निघालेल्या भरतीसाठी आपलं नशिब आजमवत आहेत. यासाठी ते प्रचंड मेहनत घेत आहेत. ते प्रचंड जिद्द आणि चिकाटीने परीक्षेचा अभ्यास करत आहेत. असं असताना नाशिकमध्ये तलाठी परीक्षेत गैरप्रकार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या वेब इन्फोटेक सोल्युशन, प्रा. लि. या केंद्रावर तलाठी पदासाठी ऑनलाईन परीक्षा सुरु असताना गैरप्रकार झाल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी कारवाई केली. म्हसरुळ परिसरातील दिंडोरी रोडवरील केंद्राबाहेरून एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून वॉकीटॉकी, मोबाईल फोन, टॅब आणि हेडफोन जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी अटक केलेला तरुण हा औरंगाबाद जिल्ह्याचा रहिवासी असून त्याच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटो आढळले आहेत. या व्यक्तीच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number