‘आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे’

बीड, १७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीडच्या सभेत पक्षाच्या महिला नेत्या सक्षणा सलगर यांनी आक्रमक भाषण केले. ‘सगळे पवारसाहेबांच वय काढतात, पण एका कवीने लिहून ठेवलंय की, “आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. विचार बाकी आहे”. “पवार साहेब आम्ही तरुण मंडळी आहोत. हे रणांगण आहे. या रणांगणात तरुणांची संख्या […]

‘आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे’

बीड, १७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीडच्या सभेत पक्षाच्या महिला नेत्या सक्षणा सलगर यांनी आक्रमक भाषण केले.

‘सगळे पवारसाहेबांच वय काढतात, पण एका कवीने लिहून ठेवलंय की, “आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. विचार बाकी आहे”. “पवार साहेब आम्ही तरुण मंडळी आहोत. हे रणांगण आहे. या रणांगणात तरुणांची संख्या जास्त आहे. तरुण का भारवला आहे? ६५ वर्षाचा सह्याद्री आम्ही असा तसा रिटायर होऊ देणार नाही” असं सक्षणा सलगर म्हणाल्या.

” जे फलक लावताय ना आमच्या माणसाला साथ द्या, आमचा माणूस कामाचा, आता कामाचा माणूस की लबाड हे जनता ठरवेल. लबाडाला हबाडा बीड जिल्हा देणार. भलेभले हबाडा घेऊन घरी बसणार आहेत, हे सांगण्यासाठी ही सभा आहे” असं सक्षणा सलगर यांनी सांगितलं.

“भाजपाला मला सांगायच आहे की, आजपर्यंत ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करत होतात. त्या सगळ्या लोकांना घेऊन स्वच्छ करुन टाकलत. सबकी पसंद भाजप असं झालय. पण मी एक गोष्ट सांगते, गुजरात महाराष्ट्राला चालवत असेल, तर आम्ही ते सहन करणार नाही. आमचा सह्याद्री अजून जिवंत आहे. दिल्लीला धडकण्याची ताकत महाराष्ट्राला शिवरायांनी, आंबेडकर, शाहू -फुलेंनी दिलीय” असं सक्षणा सलगर म्हणाल्या.

“निवडणुका येतात आणि जातात, महाराष्ट्राची अस्मिता गुजरातच्या हाती द्यायची नाही. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी मोदी-शाह यांना धडा शिकवला, तसाच महाराष्ट्र हा वीरांचा-शूरांचा आहे. या मातीतील माणूस कणखर आहे. हा स्वाभिमान, अस्मिता जपण्यासाठी पवारांना संधी द्यायची आहे” असेही सक्षणा सलगर म्हणाल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number