राष्ट्रवादीतील दोन कट्टर विरोधकांची गळाभेट

मुंबई, २४ जुलै २०२३, प्रतिनिधी: राज्याच्या सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सोमवारी विधीमंडळात आमदार निधी वाटपाचा मुद्दा गाजला. तर विधीमंडळाबाहेर राष्ट्रवादीच्या दोन प्रदेशाध्यक्षांची गळाभेट गाजली. अधिवेशनामध्ये हे दोन्ही नेते एकमेकांसमोर येताच त्यांनी गळाभेट घेत राजकारणापलिकडच्या मैत्रीचे दर्शन घडवले. राष्ट्रवादी पक्षाच्या ताई गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि दादा गटाचे सुनील तटकरे यांची गळभेट सध्या चर्चेत आहे. […]

राष्ट्रवादीतील दोन कट्टर विरोधकांची गळाभेट

मुंबई, २४ जुलै २०२३, प्रतिनिधी: राज्याच्या सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सोमवारी विधीमंडळात आमदार निधी वाटपाचा मुद्दा गाजला. तर विधीमंडळाबाहेर राष्ट्रवादीच्या दोन प्रदेशाध्यक्षांची गळाभेट गाजली. अधिवेशनामध्ये हे दोन्ही नेते एकमेकांसमोर येताच त्यांनी गळाभेट घेत राजकारणापलिकडच्या मैत्रीचे दर्शन घडवले.

राष्ट्रवादी पक्षाच्या ताई गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि दादा गटाचे सुनील तटकरे यांची गळभेट सध्या चर्चेत आहे. या दोन बड्या नेत्यांचा भेटीनंतर राजकीय चर्चांनाही उधाण आलं होतं.

ताई गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची प्रतिक्रिया

सुनील तटकरे वेगळ्या पक्षात आहेत, मी आता वेगळ्या पक्षात आहेत. मात्र आमच्यात ऋणानुबंध असू शकतात. त्याचा राजकीय अर्थ काढू नये. सगळ्यांशी माझे चांगले संबंध आहेत, असं जयंत पाटील यांनी म्हटलं मी शरद पवार यांच्यासोबत आहे म्हणून या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये. आम्ही सुनील तटकरे यांच्यासोबत ३० वर्षे काम केले. तिथे खाजगी स्वरूपाचा विनोद झाला. विधानसभा परिसरात चोरुन फोटो काढणारे आहेत. खाजगी प्रसंगाशी चर्चा झाली, त्यातून विनोद झाला, असं स्पष्टीकरणही जयंत पाटील यांनी दिलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number