तळई ,माळीन आणि इरशाळवाडीची पुनरावृत्ती होण्याच्या भीतीने काशीद कोपर गावातील जनता भयभीत झाले असून रात्रपाळी करून जीवन जगत आहेत. या पूर्वी २ वेळा भूस्खलन झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले असून भविष्यात माळीनची परिस्थिती उद्भवल्यास एमएमआरडीए च्या आडमुठे धोरण त्याला कारणीभूत असणार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. विरार मधील काशीद कोपर गावाच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी गावकरी आणि पर्यावरण प्रेमी झटत आहेत.
तळई ,माळीनच्या इरशाळवाडी च्या नुकत्याच झालेल्या घटनेन सर्व गाव भयभीत झाले असून त्या घटनेचा शाळकरी विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम झाला आहे. इरशाळ वाडीतील घटना हि नैसर्गिक असून काशीद कोपर मध्ये शासनाने डोंगर पोखरला आहे .