ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन

मराठी तसेच हिंदी नाटक सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते जयंत सावरकर यांचं सोमवारी (२४ जुलै) निधन झालं. वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळानं सावरकरांचं निधन झालं. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १०० हून अधिक मराठी अजरामर नाटकांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. जयंत सावरकर यांचा जन्म ३ मे १९३६ रोजी […]

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन

मराठी तसेच हिंदी नाटक सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते जयंत सावरकर यांचं सोमवारी (२४ जुलै) निधन झालं. वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळानं सावरकरांचं निधन झालं. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

१०० हून अधिक मराठी अजरामर नाटकांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. जयंत सावरकर यांचा जन्म ३ मे १९३६ रोजी गुहागर येथे झाला.वयाच्या विसाव्या वर्षी १९५४ पासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. वयाच्या ७३व्या वर्षांपर्यंत त्यांच्या अभिनयाची कारकीर्द सुरूच राहिली.जयंत सावरकर यांच्या निधनानंतर चाहत्यांसह मराठी मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटी शोक व्यक्त करत आहेत. गेल्या चार दशकांपासून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. जयंत सावरकर हे ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. जयंत सावरकर हे रंगकर्मी असण्यासोबत मालिका, सिनेमा वेबसीरिजमध्येही ते झळकले आहेत.

अपराध मीच केला (गोळे मास्तर), अपूर्णांक (ब्रम्हे),अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष),अल्लादीन जादूचा दिवा (हुजऱ्या), अवध्य (नाचणे), आम्ही जगतो बेफाम (चिवटे),एकच प्याला (तळीराम) सारख्या अनेक दर्जेदार मराठी नाटकात त्यांनी काम केलं. १०० हून अधिक नाटकात काम करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावे आहे.

“मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या हे एकदम ठीक होते. ते नेहमी पॉझिटिव्ह होते. मानसिकरित्या ते अतिशय खणखर होते. ते दररोज व्यायाम करायचे. ते आज आपल्यात नाही ही फार दु:खाची गोष्ट आहे. त्यांनी प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून आशिर्वाद दिलेले आहेत. छान काम करा असं ते नेहमी आम्हाला सांगायचे. माणसाने शारिरीकच नाही तर मानसिकदृष्ट्याही फिट असायला हवं असं ते सांगायचे. अतिशन अभ्यासपूर्ण काम ते करायचे. मन लावून काम करायचे”, अशी प्रतिक्रिया मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष, अभिनेते प्रशांत दामले यांनी जय महाराष्ट्र बोलताना दिली.

“आई कुठे काय करते’ या मालिकेत आम्हाला सोबत कअक़म करण्याचे योग आले. आम्हाला त्यांचा सोबत फार जवळून काम करण्याची संधी मिळाली. त्यांना फार जवळून अनुभवता आले. त्यांचे मराठी भाषेवरचे प्रभुत्व या अशा गोष्टी त्यांचा कडून आम्हाला शिकता आल्या. आम्ही त्यांना अभिनय करताना पाहतच राहायचो. मला या गोष्टीच फार वाईट वाटत की अजून काही क्षण त्यांचा सोबत . त्यांचं वय फार होत परंतु तरुणांना देखील लाजवणार त्याचं काम प्रति असणारी निष्ठा होती.” अशी प्रतिक्रिया मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष, अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनी जय महाराष्ट्र बोलताना दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number