चांद्रयान मोहिमेला मुंबईचे इंजिन

मुंबई, ११ जुलै २०२३, प्रतिनिधी: चंद्रयान-३ मोहिमेच्या प्रक्षेपणाकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. चंद्रयान ३ मोहिमेला गोदरेज कंपनीने हातभार लावला आहे. चंद्रयानाला उर्जा देणारे इंजिन मुंबईतील प्लांटमध्ये तयार करण्यात आले आहे. ‘चंद्रयान-३’ शुक्रवारी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित होणार आहे. त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना या मोहिमेत गोदरेज अॅण्ड बॉयस कंपनीची उपकंपनी असलेल्या […]

चांद्रयान मोहिमेला मुंबईचे इंजिन

मुंबई, ११ जुलै २०२३, प्रतिनिधी: चंद्रयान-३ मोहिमेच्या प्रक्षेपणाकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. चंद्रयान ३ मोहिमेला गोदरेज कंपनीने हातभार लावला आहे. चंद्रयानाला उर्जा देणारे इंजिन मुंबईतील प्लांटमध्ये तयार करण्यात आले आहे. ‘चंद्रयान-३’ शुक्रवारी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित होणार आहे. त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना या मोहिमेत गोदरेज अॅण्ड बॉयस कंपनीची उपकंपनी असलेल्या गोदरेज एअरोस्पेस अँड डिफेन्सचा मोलाचा सहभाग आहे.

गोदरेजचा इस्रो संबंध
सर्व लिक्विड इंजिन आणि सॅटेलाइट थ्रस्टर्स मुंबईतील विक्रोळी येथील सुविधेमध्ये तयार करण्यात आले आहेत. ही सर्व स्वदेशी उत्पादने आहेत. भारताच्या वाढत्या अवकाश क्षेत्रासाठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. गोदरेज ३० वर्षांहून अधिक काळ इस्रोशी संबंधित आहे.

भारत चौथा देश बनणार

चंद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर आपले अंतराळ यान उतरवणारा भारत हा चौथा देश बनणार आहे. चंद्रयान-३ मोहिमेचे मुख्य लक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि यशस्वी लँडिंग करणे हा आहे. २३ किंवा २४ ऑगस्टच्या सुमारास चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याचा प्रयत्न करेल, असे इस्रोच्या अध्यक्षांनी सांगितलं होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number