वारकऱ्यांवर पोलीसांचा लाठीमार

पुणे, ११ जून, २०२३, प्रतिनिधी : आळंदीत वारकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला आहे. मंदिर प्रशासनाची शिस्त मोडणाऱ्या वारकऱ्यांवर पोलीसांनी लाठीमार केला आहे. आळंदीत वारकऱ्यांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. वारकऱ्यांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांनी हस्तक्षेप करत वारकऱ्यांवर लाठीमार केला आहे. या प्रकरणी, ‘वारकऱ्यांवर लाठीमार झालेला नाही, तर किरकोळ झटापट झाली’, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. गेल्या वर्षीही […]

वारकऱ्यांवर पोलीसांचा लाठीमार

पुणे, ११ जून, २०२३, प्रतिनिधी :

आळंदीत वारकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला आहे. मंदिर प्रशासनाची शिस्त मोडणाऱ्या वारकऱ्यांवर पोलीसांनी लाठीमार केला आहे.

आळंदीत वारकऱ्यांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. वारकऱ्यांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांनी हस्तक्षेप करत वारकऱ्यांवर लाठीमार केला आहे.
या प्रकरणी, ‘वारकऱ्यांवर लाठीमार झालेला नाही, तर किरकोळ झटापट झाली’, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.

गेल्या वर्षीही चेंगरीचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती. त्यात काही महीला आणि वारकरी जखमी झाले होते. हे टाळण्यासाठी, वारकऱ्यांशी सल्लामसलत करून मर्यादित वारकऱ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आला. मात्र, रविवारी (११ जून) स्थानिक युवकांनी हे नियम मोडले. त्यामुळे, पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी, तेथील स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number