उद्धव गटाचे शिष्टमंडळ विधानभवनात

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी ११ मे निकाल जाहीर झाला. न्यायालयाच्या निकालानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून ठाकरे गटानं १६ आमदारांच्या अपात्रतेसाठी आक्रमक रणनीती आखली आहे. त्याचाच भाग म्हणून ठाकरे गटाचं शिष्टमंडळानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करणारं निवेदन आज १५ मे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिली आहे. तसेच शिंदे गटाने नियुक्त केलेले […]

उद्धव गटाचे शिष्टमंडळ विधानभवनात

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी ११ मे निकाल जाहीर झाला. न्यायालयाच्या निकालानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून ठाकरे गटानं १६ आमदारांच्या अपात्रतेसाठी आक्रमक रणनीती आखली आहे. त्याचाच भाग म्हणून ठाकरे गटाचं शिष्टमंडळानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करणारं निवेदन आज १५ मे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना दिली आहे.

तसेच शिंदे गटाने नियुक्त केलेले मुख्य प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती देखील घटनाबाह्य असल्याचं म्हटलं. तसेच १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे अधिकार सोपवण्यात आला. ठाकरे गटाचे शिष्टमंडळ विधानभवनात दाखल झालं.

सचिन अहिर म्हणाले,
विधानसभेच्या अध्यक्षांच्या कुठल्याही निर्णयाबद्दल आत्ता वाच्यता करणं किंवा आत्ता भाकित करणं उचित ठरणार नाही. ते आल्यावर आम्ही आमचा युक्तिवाद करू. अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी याप्रकरणी त्वरित कारवाई करायला हवी होती. त्यांनी यासाठी दौरा सोडून यायला हवं होतं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number