भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र दौऱ्यावर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बहुमतांनी काँग्रेसचा विजय झाला. काँग्रेसचा हा विजय भाजपाला जिव्हारी लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील सत्ता वाचवण्यासाठी भाजपच्या गोटात हालचालींना वेग आल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार भाजपाने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, यासाठी भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा १७ आणि१८ मे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. आगामी काळात लोकसभा, विधानसभा आणि […]

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र दौऱ्यावर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बहुमतांनी काँग्रेसचा विजय झाला. काँग्रेसचा हा विजय भाजपाला जिव्हारी लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील सत्ता वाचवण्यासाठी भाजपच्या गोटात हालचालींना वेग आल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार भाजपाने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, यासाठी भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा १७ आणि१८ मे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.

आगामी काळात लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपला मोर्चा तरुणांकडे वळवला आहे. राज्यात आधीच पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावतीने युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन होत असताना आता मुंबईतील युवकांना भाजपा साद घालणार आहे.

येत्या १८ मे रोजी युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत. युवा संवाद मेळाव्यातून युवकांना करिअरबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. येत्या निवडणुकीत भाजपा नवीन मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाने सुरुवात केली आहे. भाजपाचे आमदार, खासदार यांना कामगार, महिला, युवकांशी संपर्क साधण्याचे आदेश दिले आहेत.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number