सुनील शेळकेंचे समर्थकांना आवाहन

मावळमध्ये जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची भर दिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या फिर्यादीत राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके सह ३ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सुनील शेळकेंच्या समर्थकांनी त्यांच्या घरावर मोर्चा जमवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंचे समर्थक त्यांच्या तळेगावच्या घराबाहेर जमले […]

सुनील शेळकेंचे समर्थकांना आवाहन

मावळमध्ये जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची भर दिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या फिर्यादीत राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके सह ३ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सुनील शेळकेंच्या समर्थकांनी त्यांच्या घरावर मोर्चा जमवला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंचे समर्थक त्यांच्या तळेगावच्या घराबाहेर जमले असताना त्यासर्वांना संबोधित असताना शेळकेंनी ‘तालुक्यात शांतता राखा. कोणतीही अराजकता माजणार नाही, तसेच चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्याचा पायंडा पडू नये; यासाठी आपण कार्यशील राहू.’ असं आवाहन केलं आहे.

आमदार शेळके आणि त्यांच्या भावावर किशोर आवरेंच्या हत्येचा कट रचल्याचा चुकीचा गुन्हा दाखल केला, म्हणून रविवारी त्यांचे समर्थक मोर्चासाठी एकत्र जमले होते. मात्र आमदार शेळकेंच्या आवाहनानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात आला. आवरेंच्या आईने तशी फिर्याद दिल्यानंतर शेळकेंचे समर्थक त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या घरासमोर जमले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number