पाचोरा तालुक्यातील नाचणखेड्याच्या पंकज राजेंद्र महाले या तरूणाने अनोखे आंदोलन केले आहे. या अनोख्या आंदोलन बाबत जळगावात चर्चा सुरु आहे.
राज्यातल्या सर्व समाजांमधील शेतकरी तरूणांना वधू मिळण्यात किती अडचणी येतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मुलींना मुलाकडे शेती हवी असली तरी त्या स्वत: शेतात जाण्यासाठी तयार नसल्याचे आजचे चित्र आहे.
याच विरोधाभासावर शुक्रवारी पाचोरा तालुक्यातील नाचणखेड्याच्या पंकज राजेंद्र महाले या तरूणाने अनोखे आंदोलन केले आहे. ”आपण मेहनती आणि सधन बागाईतदार असून आपल्याला बागायतदारीणच म्हणजे शेतात काम करणारी बायको हवी!” असे जाहीर करून त्याने एकीकडे धमाल उडवून देतांना दुसरीकडे समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. याबाबत जळगावात आंदोलनाची चर्चा सुरु आहे.