चंद्रपुर जिल्हा बैंकेच्या अध्यक्षावर गोळीबार

चंद्रपूर, १२ मे २०२३, प्रतिनिधी : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर अज्ञाताने गोळीबार केला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मूल शाखेच्या परिसरात ठीक गुरुवारी ११ मे रोजी रात्री ९:३० च्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात रावत यांच्या डाव्या हाताला गोळी स्पर्शून गेल्याने त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली. गोळीबार करणारा अज्ञात असून […]

चंद्रपुर जिल्हा बैंकेच्या अध्यक्षावर गोळीबार

चंद्रपूर, १२ मे २०२३, प्रतिनिधी : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर अज्ञाताने गोळीबार केला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मूल शाखेच्या परिसरात ठीक गुरुवारी ११ मे रोजी रात्री ९:३० च्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात रावत यांच्या डाव्या हाताला गोळी स्पर्शून गेल्याने त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली.

गोळीबार करणारा अज्ञात असून तो फरार झाला आहे. संतोष रावत यांच्यावर गोळीबार का करण्यात आला किंवा कोणत्या हेतूने करण्यात आला. हा गोळीबार कोणी केला याचा तपास सुरु आहे.तसेच हल्लेखोर स्विफ्ट डिझायर गाडीने आले होते. हल्ल्यानंतर हल्लेखोर नागपूर मार्गे पसार झाले . -सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत हे सी.डी.सी.सी.बँक शाखा मुल समोरून आपल्या स्कूटीकडे जात असताना बँकेचे समोर काही अंतरावर रोडवर उभ्या असलेल्या स्विप्ट गाडी नंबर (एमएच ३४ ६१५२) यात बसून असलेल्या बुरखा धारक व्यक्तीने रावत यांचेवर गोळीबार केला.

यासंदर्भात मूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान याघटनेने परिसरात खळबळ उडाली. हल्ल्याचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number