‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावर देशात राजकारण सुरू आहे, उत्तर प्रदेशमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे,तर याच चित्रपटावर अनेक राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांसोबत ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट पहिला.
हा चित्रपट लव्ह जिहादवर आधारित आहे. या चित्रपटात केरळमधील हरवलेल्या मुलींचे धर्मांतर कसे केले जाते आणि त्यांच्यावर कसा अत्याचार केला जातो हे दाखविलं आहे. ‘द केरला स्टोरी’ चित्रपट महाराष्ट्रात दाखवला जात आहे.परंतु या चित्रपटालाही विरोध होत आहे. राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटाच्या निर्मात्याला फासावर लटकवण्यात यावे असे वक्तव्य केले होते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्यावर सांगितले की, जितेंद्र आव्हाड यांच्या वाईट विचारणा फाशी देणे आवश्यकता आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपट निर्मात्यांला जाहीररित्या फाशी दिली पाहीजे असं वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
फडणवीस म्हणाले की,
हा सिनेमा पाहिल्यावर मी एकाच गोष्ट म्हणेन की, जे लोकं या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला भरचौकात फाशी दिली पाहिजे. त्यांच्या सडक्या मेंदूतल्या सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आज आली आहे, असं मी हा सिनेमा पाहिल्यावर म्हणेन.