भाडे नाकारणाऱ्या चालकांनो सावधान

मुंबई, १० मे २०२३,प्रतिनिधी : मुंबईमध्ये रिक्षा तसेच टॅक्सी चालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चाली आहे. टॅक्सी आणि रिक्सघ चालक हे सर्रासपणे भाडे नाकारतात त्यामुळे पप्रवाशांना प्रचंड त्रास होतोय. आता या मुजोर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना भाडं नाकारणं महागात पडणार आहे. कारण मुंबई पोलिस याबाबत मोठं पाऊल उचलत असून नवीन आदेश जारी करणार आहे. यापुढे भाडं […]

भाडे नाकारणाऱ्या चालकांनो सावधान

मुंबई, १० मे २०२३,प्रतिनिधी : मुंबईमध्ये रिक्षा तसेच टॅक्सी चालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चाली आहे. टॅक्सी आणि रिक्सघ चालक हे सर्रासपणे भाडे नाकारतात त्यामुळे पप्रवाशांना प्रचंड त्रास होतोय. आता या मुजोर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना भाडं नाकारणं महागात पडणार आहे. कारण मुंबई पोलिस याबाबत मोठं पाऊल उचलत असून नवीन आदेश जारी करणार आहे. यापुढे भाडं नाकारणाऱ्या या चालकांविरोधात कडक कारवाई करत त्यांचा परवाना रद्द केला जाणार आहे.

मुजोर टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या मनमानी कारभाराविरोधात आता मुंबई पोलिस कडक कारवाई करणार आहेत. ऑटो किंवा टॅक्सीमध्ये बसण्यास प्रवाशाला नकार देणाऱ्या चालकांचे परवाने रद्द किंवा निलंबित केले जाणार आहेत. बेकायदा रिक्षाचालकांविरोधात पोलिसांकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. हे मुजोर रिक्षा-टॅक्सी चालक प्रवाशांना गाडीत बसण्यास नकार देतात. तसंच ते बॅच आणि गणवेश देखील घालत नाहीत, कमी अंतरासाठी जास्त शुल्क आकारतात, विहित संख्येपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मुंबई पोलिस पुढील आठवड्यापासून विशेष मोहीम राबवत आहेत.

वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रवीण पडवळ यांच्या माहितीनुसार,

मुंबईत रेल्वे स्टेशन्सच्या आजूबाजूला बेकायदा पद्धतीनं गाड्या पार्क करणारे, वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई केली जाणार आहे. याबाबतचं सविस्तर निवेदन आरटीओला पाठवण्यात आलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number