द केरळ स्टोरी चित्रपटावरून आव्हाड आक्रमक

‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाला भाजप शासित राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात येत आहे. तर पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटाला ममता बॅनर्जी सरकारने बंदी घातली असून, यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ‘द केरल स्टोरी’ चित्रपट हा केरळला बदनाम करणार असून यांच्या निर्मात्याला फाशी देण्याची मागणी केली आहे. सध्य […]

द केरळ स्टोरी चित्रपटावरून आव्हाड आक्रमक

‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाला भाजप शासित राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात येत आहे. तर पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटाला ममता बॅनर्जी सरकारने बंदी घातली असून, यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ‘द केरल स्टोरी’ चित्रपट हा केरळला बदनाम करणार असून यांच्या निर्मात्याला फाशी देण्याची मागणी केली आहे.

सध्य घडीला द केरळ स्टोरी चित्रपटावरुन मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. लव जिहाद सारख्या वेगळ्या मुद्याला स्पर्श करत हा चित्रपट हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मांतील काही गोष्टींवर प्रकाशही टाकतो.

दरम्यान या चित्रपटाबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट चित्रपटावर तसेच दिगदर्शक सुदीप्तो सेन यांचावर निशाणा साधला आहे.

आव्हाड काय म्हणाले?
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटात ३२ हजार महिलांची कथा मांडण्यात आली आहे. आव्हाडांनी दावा केला की, चित्रपटाचे निर्माते हे स्वत: न्यायालयाला सांगतात की, ही कथा केवळ तीन महिलांची आहे. या चित्रपटामुळे आपल्या देशाची जगभरात बदनामी झाली असून, देशात धार्मिक द्वेष पसरवणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आव्हाडांनी केली आहे. तसेच देशाची बदनामी करणाऱ्या दी केरला स्टोरी या चित्रपटाच्या निर्मात्याला फाशी द्या, असे आव्हाड म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number