कर्नाटक निवडणुकीचा रणसंग्राम

कर्नाटक विधानसभा निवणुकीसाठी अवघे काही तास उरले असून सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती द्यायच्या हे मतदार ठरवणार आहेत. बुधवारी १० मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकातील ५ कोटी ३१ लाख मतदार मतदान करणार असून हे मतदान राज्यातील […]

कर्नाटक निवडणुकीचा रणसंग्राम

कर्नाटक विधानसभा निवणुकीसाठी अवघे काही तास उरले असून सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती द्यायच्या हे मतदार ठरवणार आहेत. बुधवारी १० मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकातील ५ कोटी ३१ लाख मतदार मतदान करणार असून हे मतदान राज्यातील २,६१५ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. मतदानादरम्यान एकूण ७५ हजार ६०३ बॅलेट युनिट, ७० हजार ३०० कंट्रोल युनिट आणि ७६ हजार २०२ व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल वापरण्यात येणार आहे.

भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे बुधवारी ठरणार आहे. बुधवारी मतदान होऊन १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटमध्ये पाच वर्षांनी राज्यात सत्ताबदल होतो. हा समज मोडून काढण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यात प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे काँग्रेसच्या राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सिद्धरमय्या व डी. के. शिवकुमार या नेत्यांनी तोडीस तोड काम करत प्रचाराचा धडाका लावला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number