नाशिकमध्ये ताब्यात घेतलेल्या त्या उंटांची चौकशी करण्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आदेश दिले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या भागातून १०० हून अधिक उंट प्राणी मित्र संघटनांनी ताब्यात घेतले आहे.
राजस्थान येथून हैदराबादकडे जाणाऱ्या जवळपास १०० हुन अधिक उंटांचा ताफा तस्करी जात असल्याचा संशय नाशिकयेथील नागरिकांना आला होता. उंटांचा भला मोठा ताफा रस्त्याने जात असल्याचे पाहून नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये गुरुवारी रात्रीच्या वेळी रस्त्यावरून उंट जात असल्याचे पाहून पशुप्रेमी तथा ॲनिमल वेल्फेअरच्या प्रतिनिधींना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ धाव घेतली होती. याबाबत पोलिसांना कळविण्यात आली होती. ही सर्व उंट पांजरपोळच्या जंगलात ठेवण्यात आली आहे.
यामध्ये दोन उंटांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. खरंतर हे उंट बघण्यासाठी नाशिकच्या रस्त्यांवर मोठी गर्दी झाल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हे उंट कुठून आले आणि कुठे जात होते यासंदर्भात सखोल चौकशी करण्याचे पालकमंत्र्यांनी पोलिसांना आदेश दिले आहे. ताब्यात घेतलेले हे सर्व उंट प्राणी मित्र संघटनांनी चिंचोळे येथील पांजरपोळ या संस्थेत ठेवले आहेत. या उंटांची तस्करी होत असल्याची भीती प्राणी मित्र संघटनांकडून व्यक्त करण्यात आली आहे.