अभिजीत पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे ते २०२४ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगली होती. विठ्ठल साखर कारखान्यच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे उद्‌घाटन राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद […]

अभिजीत पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे ते २०२४ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगली होती.

विठ्ठल साखर कारखान्यच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे उद्‌घाटन राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अभिजित पाटील यांनी पंढरपूर-मंगळवेढ्यातुन आगामी विधानसभेची तयारी सूरु केली आहे. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवावी अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती. पावारांसोबत असलेले संबंध यामुळे पंढरपूर विधानसभा मतदार संघातून पाटील यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number