मणिपूरमध्ये अडकलेल्या सर्व २२ विध्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसाम आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून बातचीत केली. विद्यार्थ्यांना सुखरूप महाराष्ट्रात आण्यासाठी लागेल ती सर्व मदत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. विशेष विमानाची व्यवस्था करत तातडीनं विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
मणिपूर राज्य पुन्हा एकदा हिंसाचाराच्या आगीत होरपळताना दिसत आहे. मणिपूर सरकारने अत्यंत गंभीर परिस्थितीत हिंसाचार करणाऱ्यांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. ३ मे रोजी मणिपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संपूर्ण राज्यात हिंसाचार उसळला आहे. हिंचासारात ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतल्यावर या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. लवकरच हे विमान या अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात येईल. अशी ग्वाही शिंदेनी आपल्या परिपत्रकात दिली आहे.