उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी (२६ एप्रिल) पुण्याचा दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आमदार राहुल कूल यांच्यावर भीमा पाटस साखर कारखान्यात ५०० कोटींचा घोटाळा केला, असा गंभीर आरोप केला. संजय राऊतांची दौंडमध्ये सभाही पार पडली. यावेळी त्यांनी राहुल कुल यांच्याविरोधात आपण ईडीकडे तक्रार करु, असंही म्हटलं. त्यावर आता कुल यांनी उत्तर दिलं आहे.
राहुल कूल म्हणाले, “माझ्याकडे हक्कभंग समिचीचं अध्यक्षपद आल्यानंतर संजय राऊत यांनी आरोप सुरू केलेत आहेत. हक्कभंग समितीची पहिली बैठक झाली आहे. दुसरी बैठक अध्यक्षांच्या कार्यवाहीनुसार होईल”, असं राहुल कुल म्हणाले. “सहकारी साखर कारखान्यात मनी लॉन्ड्रिंग झालेलं नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इथली सगळी परिस्थिती माहिती आहे. आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहोत. शक्तीप्रदर्शन काय असतं हे आम्ही वेळ आलं की दाखवून देऊ”, अशी प्रतिक्रिया राहुल कुल यांनी दिली आहे.