सायन – पनवेल मार्गावरील एलपी उड्डाणपुल बंद

सायन – पनवेल मार्गावरील नेरुळ येथील एलपी उड्डाणपुलावर सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा दुसरा अंतिम टप्पा सुरू होणार आहे. या टप्प्यात केवळ एकच मार्गिका सुरु राहणार असल्याने वाहतूक कोंडीचा सामना तब्बल एक महिना करावा लागू शकतो. याची रंगीत तालीम शनिवारी वाहतूक पोलिसांनी घेतली. सायन – पनवेल मार्गाचे संपूर्ण काँक्रीटीकरण झाले असले तरी काही पुलांवर मात्र काँक्रीटीकरण झालेले […]

सायन – पनवेल मार्गावरील एलपी उड्डाणपुल बंद

सायन – पनवेल मार्गावरील नेरुळ येथील एलपी उड्डाणपुलावर सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा दुसरा अंतिम टप्पा सुरू होणार आहे. या टप्प्यात केवळ एकच मार्गिका सुरु राहणार असल्याने वाहतूक कोंडीचा सामना तब्बल एक महिना करावा लागू शकतो. याची रंगीत तालीम शनिवारी वाहतूक पोलिसांनी घेतली.

सायन – पनवेल मार्गाचे संपूर्ण काँक्रीटीकरण झाले असले तरी काही पुलांवर मात्र काँक्रीटीकरण झालेले नाही. हे काँक्रीटीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने टप्प्या टप्प्याने सुरू केले आहे. नेरुळ येथील एलपी उड्डाणपुलावरील पुण्याच्या दिशेने जाणार्‍या एका मार्गिकेचे काँक्रिटीकरण गेल्या काही महिन्यांपुर्वी पूर्ण करण्यात आले. आता पुण्याकडे जाणार्‍या आणखी दोन मार्गिकांचे कांक्रीटकरण एकाच वेळी सुरू करण्यात येणार आहे. हे काम सुमारे महिनाभर चालणार आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेच पोलीस आयुक्त यांनी केले आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुसरा पर्याय
एलपी जंक्शनचा पुलावरील प्रवास टाळण्यासाठी हलक्या वाहनांना पामबिच मार्गाचा वापर करता येणार आहे. जड आणि अवजड वाहनांना तुर्भे जंक्शन येथून सर्व्हीस मार्गाने प्रवास करून उरण फाटा येथे पुन्हा सायन -पनवेल मार्गावर येता येणार आहे. शिळफाटा येथून पुण्याच्या दिशेने जाणार्‍या वाहनांना महापे उड्डाण पुलाखालून एचपी मार्गाने थेट उरणफाटा येथे येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number