शरद पवारांच्या भेटीला अदाणी

मागील काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्योजक गौतम अदानी यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबत सिल्वर ओक या निवासस्थानी बंद दाराआड चर्चा केली. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात चांगले संबंध आहेत. शरद पवार यांनी याआधीदेखील अदानी यांच्या उद्योगशीलतेचे कौतुक केले होते. उद्योगपती गौतम अदानी यांनी २० एप्रिल गुरवार […]

शरद पवारांच्या भेटीला अदाणी

मागील काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्योजक गौतम अदानी यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबत सिल्वर ओक या निवासस्थानी बंद दाराआड चर्चा केली.

शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात चांगले संबंध आहेत. शरद पवार यांनी याआधीदेखील अदानी यांच्या उद्योगशीलतेचे कौतुक केले होते. उद्योगपती गौतम अदानी यांनी २० एप्रिल गुरवार शरद पवारांचं निवासस्थान सिल्वर ओकवर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली. चर्चेचा विषय नेमका काय होता, याबाबत अजून माहिती मिळू शकलेली नाही. अदानी आणि पवारांचे जुने संबंध आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वीच हिंडेनबर्ग प्रकरणी पवारांनी अन्य विरोधकांपेक्षा वेगळी भूमिका घेतली होती. सुप्रीम कोर्टानं चौकशी समिती स्थापन केल्यावर जेपीसीची गरज नाही, असे पवार म्हणाले होते. मात्र, पवारांच्या या वक्तव्यावर काँग्रेस आणि इतर पक्षांनी जेपीसी चौकशीवर ठाम असल्याचे म्हटले होते. त्यानंतर पवार यांनी नरमाईची भूमिका घेतली. याआधीदेखील महाविकास आघाडीचे सरकार असताना गौतम अदानी यांनी बारामतीला भेट दिली होती. या भेटीत बारामतीत सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरचे उद्घाटन पार पडले. या उद्घाटनासाठी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहिले होते. अदानी यांच्या या भेटीनंतर काही दिवसात महाविकास आघाडीचे कोसळले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number