राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार अशा स्वरूपाचं चर्चा राज्यात सुरु असताना खुद्द अजित पवार यांनी रंगलेल्या चर्चांवर थेट उत्तर देत चर्चाना पूर्णविराम दिला आहे. जोपर्यंत जीवात जीव आहे, तोपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार’ असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. माझ्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही, आमदार मला कामानिमित्त भेटण्यासाठी आले होते.
रंगलेल्या चर्चांवर अजित पवार म्हणाले, ‘सध्या सुरु असलेल्या सर्व चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. आमदार कामानिमित्त भेटले होते. यातून कोणताही वेगळा अर्थ काढू नका. ज्या बातम्या पसरवण्यात येत आहेत, त्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. ‘कारण नसताना माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवले जात असून आहेत.’ महाराष्ट्रातील जणतेचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.’ असं देखील अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, ‘काहीही काळजी करु नका आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस राहणार. कारण नसताना माझ्याबद्दल गैरसमज पसरवले जात आहे. आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनातच राष्ट्रवादीत काम करत आहोत. बातम्यांमुळे कार्यकर्त्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नये. असं स्पष्टिकरण अजित पवार यांनी दिलं आहे.
‘मी भाजपला पाठिंबा देणार नाही आणि तशी शक्यताही वर्तवली नाही. या संदर्भातील ज्या बातम्या पेरल्या जात आहे, त्याच्यातून आमचे कार्यकर्ते नाराज होतात. त्यांनी त्यावर विश्वास ठेऊ नका’ असेही आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले आहे.